एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सची विजयी परंपरा कायम…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

 दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये 2023- 24 या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या सी बी एस ई परीक्षेमध्ये एकविरा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत विजय संपादीत केला.

           यावर्षी 123 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कृष्णाली कोकाटे 96 टक्के गुण मिळवत शाळेमधून प्रथम क्रमांक पटकावला, तन्मय अकोटकर ह्या विद्यार्थ्याने 94.60% घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला, हर्ष टेकाडे या विद्यार्थ्यांने 94.40% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला, यासह सार्थक खांडे 94.20%, आदित्य सातपुते 94% ,सुजल चांडक 93.60% ,मंजिरी तळोकार 92.2% ,कनिका जाधव 91% ,अनुष्का मोपारी 90.2% ,मोहम्मद जमादार 90% गुण, मिळवत गुणांनुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.

             शाळेची विजयी परंपरा कायम राखत सदर विद्यार्थ्यांनी आपले घवघवीत यश संपादित केले गुनानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय शाळेचे प्राचार्य लिझेश रामकृष्णण यांना दिले आहे.  विजय संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय विश्वस्त मंडळांनी सन्मान केला.