साकोलीच्या नवजीवन (सीबीएसई) चे उत्कृष्ट निकाल…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

       नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथिल १०वी सीबीएसई बोर्ड परिक्षेचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवजीवन सीबीएससी चा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेऊन सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

             उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यापैकी इशा अनिल पटीये ९३.६० टक्के घेऊन शाळेतून प्रथम, नेहा दिलीप मासुरकर ९१.८० टक्के द्वितीय, वीर विश्वजीत कुमार ९१.४० टक्के तृतीय, आयुष उत्तम दहिवले ९०.८० टक्के, आयुष पंकज डोंगरे ८९.८० टक्के, विश्लेष राहुल बडोले ८९.८० टक्के, तनिष्क विलास भावे ८८.६० टक्के, अपूर्वा ओमेश्वर कपगते ८८.४० टक्के, निशिद वसंत गहाणे ८८ टक्के, निधी सुधाकर कपगाते ८७.६० टक्के असे ३५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तसेच १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेत.

           यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था सचिव वृंदाताई करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, प्राचार्य मुज्जमिल सय्यद, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, सतिश गोटेफोडे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.