हिंगणघाट तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई रेती चे चार टिप्पर-ट्रक पकड़ले।।

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

हिंगणघाट :– स्थानिक महसूल विभाग्याच्या पथकाने शनिवार रात्रि अवैध रेती वाहतूक करताना दोन टिप्पर आणि दोन ट्रक ताब्यात घेत मोठी कारवाई केली.

       सदर कारवाई तहसीलदार सतीश मसाड़ यांचे सह मंडल अधिकारी संजय नासरे, विलास राऊत ,तलाठी प्रेम बीमरुठ ,सैय्यद अहमद,सतीश झोरे इत्यादिनी केली.

       उपरोक्त कारवाईत पंकज वानखेड़े,शुभम ढोक ,चंद्रकांत सूर्यवंशी ,दीपक मेश्राम इत्यादि रेती माफिया यांची नावें समोर येत असून त्यांचे मालकीची वाहनें अनुक्रमे एम -एच -40 /एन 72 50 ,एम एच 31/सी बी 77 59 ,सी जी 17 एच /37 17 ,एम एच 31 सीबी /9401 अर्शी मोठी टिप्पर सारखी वाहने महसूल विभाग्याच्या पथकाने त्याब्यात घेतली आहे.

         गेल्या काही दिवसांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन निवेदन देत रेती माफिया विरुद्ध तसेच अवैध धंधा वरती रोख लावण्या करिता निवेदन दिल्या वर आता महसूल प्रशासन जागी झाल्याचे दिसून येत आहे.

        याच्या अगोदर पोलीस विभाग सक्रिय होता. हिंगणघाट तालुक्यातील रेती डेपो वरती चेक पोस्ट स्थापन करण्यात आले असून रात्रीच्या वेडी अवैध रेती थांबविन्यासाठी महसूल विभागाने पथकाची सुद्धा निर्मिति केली आहे.

        तालुक्यातील सावंगी,येडी, दरोडा येथे सुद्धा चेक पोस्टची निर्मिति केली आहे. या पुढे रेती तस्करी वर अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मसाड़ यांनी दिली आहे.

        शनिवारी रात्रि दरम्यान उपरोक्त कारवाई केल्याची माहिति खुद महसूल प्रशासनाने दिली असली तरी यावेळी किती रेती साठा त्याब्यात घेतला याची माहिती मिळू शकली नाही.

           परंतु अवैध गौण खनिज उत्पन्न व वाहतूक प्रकरणी गेल्या सन 2023 -24 वर्षाने मात्र तहसील प्रशासनाने 120 वाहनावर्ती कारवाई करीत 3 कोटि ,9 लाख रुपये दंड वसूल केला.