दखणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकलचे वितरण… — मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप… 

भाविक करमनकर 

 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

           धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत 2023- 24 या सत्रातील बाहेर गावावरून 5 कि.मी अंतरावरून ये – जा करीत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.

           याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा मुख्याध्यापक महेंद्र जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली सायकल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच शिवप्रसाद गवर्णा मनोहरसिंग परिहार, कमलेश मडावी, श्रावण भोयर, पाऊल बुरेवार, शिवलाल हलामी, महेंद्र नैताम शिवदास जांभुळे,आदी पालकांच्या उपस्थितीत सात विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.

    शालेय विद्यार्थिनींना सदर योजनांतर्गत सायकलचे वितरण झाल्याने त्यांना शाळेत येणे सुकर झाले आहे.

          कार्यक्रमासाठी सहाय्यक शिक्षक भास्कर मेश्राम, घनश्याम चिंचोलकर, शिक्षकेतर कर्मचारी विलास चौधरी, सुरेश तुलावी, रामाधर राणा, रमेश निसार यांचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव बाळकृष्ण बोरकर यांनी संचालन केले व आभार मानले.