बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बारामती लोकसभेच्या प्रचार दौऱ्या निमित्त दिनांक 3 मे रोजी बावडा तालुका इंदापूर येथे आले असता.
भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संचालक संजय बोडके व सामाजिक कार्यकर्ते हानुमंत सुतार पिंपरी बुद्रुक यांनी मागणी केलेल्या अर्जास अखेर 10 मे रोजी यश आले. आणि भीमा नदी पात्रात खळखळून पाणी आले याचा आनंद शेतकरी व गोरगरिब जनतेला झाला.
प्रचार सभेत बावडा येथे शेतकऱ्यांसाठी 3 मे रोजी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाळला. म्हणूनच उजनीतून भीमा नदी पात्रात पाच टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले. त्यामुळे पिंपरी बुद्रुक येथील सर्वच कार्यकरते यांच्यामध्ये उत्सुकता व आनंद निर्माण झालेला आहे. पालकमंत्री अजित दादा पवार यांचे अनेक भागा-भागातून शेतकरी आभार व्यक्त करू लागले आहेत.
अजित दादा पवार यांच्या कामाची पद्धत जे बोलतात ते करूनच दाखवीतात 3 तारखेला भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी दिलेला शब्द अखेर दखल घेऊन शुक्रवार दिनांक 10 मे रोजी भीमा नदी पात्रात पाणी आले. शेतकऱ्यांच्या शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले याचा आनंद या भागातील शेतकऱ्यांना होऊ लागला.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे या भागातील संजय बोडके व हनुमंत सुतार यांच्या सहित सर्वच ग्रामस्थ व शेतकरी यांनी आभार व्यक्त केले.