
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत इटकी फाट्याजवळ रविवारी दि 5 मे ला सायंकाळी आठ वाजताच्या 60 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.
मृतकाची ओळख पटावी म्हणून त्याचे प्रेत उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे तीन दिवस ठेवले होते. मात्र तीन दिवसांनंतरही मृतदेह नेण्यास कुणीही आले नसल्याने सामाजिक दायित्व व माणुसकी पार पाडण्यासाठी खल्लार पोलिस स्टेशनचे पो हे कॉ किशोर घुगे, दर्यापूर येथिल सामाजिक कार्यकर्ते रामुसेठ मालपाणी व सचिन शेलार यांच्या मदतीने 60 वर्षीय अनोळखी इसमावर दर्यापूर येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.