दिक्षा कऱ्हाडे
मुख्य कार्यकारी संपादक
एमपीएससीच्या लोकसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती मधून प्राविण्यासह राज्यात प्रथम येणे साधारण बाब नाही.
मात्र चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यामधील मौजा पांढरवाणी या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या कुमारी शालु शामराव घरत या मुलींने बिकट परिस्थितीवर मात करून अनुसूचित जमाती गटातून (एमपीएससीच्या) लोकसेवा आयोग परिक्षेत प्राविण्यासह महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलाय.ही बाब चिमूर तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.
कुमारी शालु शामराव घरत हीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षे अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक घेताच तिला उधोग निरिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाने शासकीय सेवेत घेतले.
ग्रामीण भागातील क्वचितच अशा मुली असतात की स्वतःच्या आत्मविश्वासावर भरोसा ठेवून यशस्वी होतात.
याचबरोबर तेथीलच कुमारी सानिया ज्ञानेश्वर घुटके ही केवळ १९ व्या वर्षी पोस्ट आॅफीस मध्ये नोकरीला लागली.
आजच्या कठीण काळात एकाच गावातील दोन मुली शासकीय सेवेत रुजू होणे म्हणजे त्या गावातील विद्यार्थ्यांसाठी,विद्यार्थीनींसाठी आणि नागरिकांसाठी आनंददायी बाब आहे व प्रेरणादायी प्रसंग आहे.
म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे(मौजा नेरी),जिल्हा कोषाध्यक्ष ॲड.ज्ञानेश्वर नागदेवते(मौजा नेरी),प्रभाकर पिसे सर,प्रा.वाघमारे सर,भीमराव घुटके सर,पुरुषोत्तम पंधरे सर,नन्नावरे सर यांनी,”उधोग निरिक्षक कुमारी शालु शामराव घरत व कुमारी सायना ज्ञानेश्वर घुटके यांचा प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन सन्मानपूर्वक पुष्पगुच्छाद्वारे सत्कार केला व उज्ज्वल भविष्यासाठी दोघींनाही मनःपुर्वक शुभेच्छा प्रदान केल्यात.
याप्रसंगी गावकरी महिला,पुरुष,मुले व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.