कोजबी जि.प. उच्च प्राथमिक शाळा येथे 1 मे महाराष्ट्र दिन तथा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न…

अश्विन बोदेले

जिल्हा प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

कोजबी :- आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील जी. प. उच्च प्राथमिक शाळा येथे 1 मे महाराष्ट्र दिन तथा शाळेतील मुख्याध्यापक श्री.सोनटक्के सर यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

            यावेळी जी.प. उच्च प्राथमिक शाळेतील 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेतील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर वर्ग एक ते सात पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

           त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथील मुख्याध्यापक श्री. सोनटक्के सर यांची जिल्हा परिषद हिंगोली येथे बदली झाली त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

           तत्पूर्वी सोनटक्के सर यांच्या सत्कार व समारंभाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी शाळेतील मुख्याध्यापक आदरणीय श्री. सोनटक्के सर यांच्या सत्कार व निरोप समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 

     उत्तुंग व्यक्तिमत्वच धनी श्री. सोनटक्के सर…

          जी.प. उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथील मुख्याध्यापक श्री. सोनटक्के सर हे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. हे त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने दाखवून दिले आहे.

           श्री. सोनटक्के सर यांचे शाळेच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. तसेच त्यांना शाळेतील सहायक शिक्षक श्री ठेंगरी सरांचे साथ सुद्धा मिळाली. 

           श्री सोनटक्के सर शाळेच्या भौतिक, सांस्कृतिक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खूप असे मोलाचे कार्य केले आहे. शांत व संयमी स्वभाव असल्यामुळेच सरांनी गावातील लोकांच्या मनावर आपल्या मनमिळावू स्वभावाचा अमीट ठसा उमटवला. 

          शाळेत अध्यापनाचे कार्य करीत असताना गावातील गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांना काय करावे लागेल ते व्यवस्थित समजावून सांगून असत. विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावेळी श्री सोनटक्के सर यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. 

            यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिनेश बनकर , उद्घाटक कोजबी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. कविताताई ताडाम, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विनोद मानकर , शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री रोहिदास जी सहारे, सहाय्यक शिक्षिका राऊत मॅडम, ग्रामपंचायत सचिव ढोरे मॅडम , आरोग्य अधिकारी बामणे मॅडम , आरोग्य सेविका धोटे मॅडम , सौ. पौर्णिमा मानकर ग्रा. पं. सदस्य ,सौ. पूनम बोदेले ग्रा. पं. सदस्य, सौ. लोचना जुमनाके ग्रा. पं. सदस्य, गुलाब ताडाम, अश्विन बोदेले पत्रकार, राहुल लिंगायत, गुलाब जुमानके, सदाशिव शेंडे, मोरेश्वर सयाम ग्रामपंचायत शिपाई, रोशन दुमाने ग्रामपंचायत शिपाई ई. उपस्थित होते. 

         कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक श्री. प्रशांत ठेंगरी सर तर आभार अश्विन बोदेले यांनी मानले.