राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
तालूक्यातील नान्ही येथे आदिवासी कवर समाज क्षेत्रीय समीती नान्ही यांच्या वतीने आज सोमवार रोजी आदिवासी कवर समाज आदर्श विवाह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कवर समाजाचे महाराष्ट्र व छत्तीसगढ़ या दोन राज्यातील २९ वर-वधू जोडपी विवाहबद्ध झाली.
खाजगी विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा समाज कर्ज बाजारी होऊ नये याकरीता आदिवासी कवर समाजाचा वतीने नान्ही येथे मागील सलग २५ वर्षापासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे आज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उदघाटन आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी कवर समाज राजनांदगांव (छत्तीसगढ़) चे अध्यक्ष बिंदुलाल फुलकूवर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतभाऊ दूधनांग, कवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ प्रा मेघराज कपूर, माजी प स सभापती परसराम टिकले, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन नाट, गोंदिया जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे, आदिवासी समाज कार्यकर्ते रामदास मसराम,सूनेर सोनटापर, ब्रिजलाल बागडेरीया,चंन्द्रभान हूंडरा,देवरी पंचायत समिति सभापती अंबिका बंजार,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे माजी प स सभापती गिरीधर तितराम,गणपत सोनकूसरे, सिराज पठान, चंपाबाई सोनकूकरा आदि उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविकातून डॉ.मेघराज कपूर यानी समाजाला भेडसावणार्या समस्यांचा उहापोह करीत शाशकीय स्तरावरून आदिवासी कवर समाजाचा समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आमदार कृष्णा गजबे यानी समाजाला भेडसावणार्या समस्यां जाणून घेण्याकरीता समाजाची बैठक घेत आयोजित करीत त्या मार्गी लावण्याकरीता शाशन स्तरावर पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन सोनू कपूर व गणेश सोनकलंगी यानी तर आभार प्रदर्शन शिक्षक कृष्ण चंन्द्रमा यानी केले कार्यक्रमात महाराष्ट्र व छत्तीसगढ़ राज्यातील कवर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते.