चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागील वीस वर्षापासून सातत्याने दरवर्षी पावसाळी (मान्सून) ,हिवाळी व उन्हाळी पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना उपक्रम घेतले जात असून जागतिक वसुंधरा दिन व लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने ‘चला पक्षी पहायला’ हा उपक्रम गुरुकुल आयटीआयच्या सहकार्याने जानेवारी ते एप्रिल महिन्यात पाच वेळा राबविण्यात आला.
याबद्द्ल अधिक माहिती देताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी संगितले की पक्षी व फूलपाखरे यांचे तसेच निसर्गाच्या विविध घटकांच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम ,निसर्गसंवर्धनविषयक जाणीव जागृती कोवळ्या वयात तयार होत असल्याने असे प्रत्यक्षकृतीपर उपक्रम ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागील वीस वर्षापासून सातत्याने निःशुल्क घेतले जात आहेत.या उपक्रमास लाखनी नगरपंचायत स्वच्छता विभाग, नेफडो जिल्हा भंडारा,अ.भा. अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा गोंदिया पर्यावरण विभाग यांचे सहकार्य लाभले.
चला पक्षी पहायला उपक्रमाअंतर्गत गुरूकुल आयटीआयचे निवडक 25 विद्यार्थ्यांना प्राचार्य खुशालचंद्र मेशराम यांचे मार्गदर्शनाखाली जानेवारी महिन्यात रेंगेपार कोहळी तलावावर,फेब्रुवारी महिन्यात सोनमाळा,रावनवाडी तलावावर, मार्च महिन्यात मानेगाव तलावावर तर एप्रिल महिन्यात सावरी व लाखनी तलावावर पक्षी व फुलपाखरे निरीक्षण उपक्रम घेण्यात आला.सावरी तलावावर राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे 6 विद्यार्थीनी सुद्धा डिसेंम्बर महिन्यात सहभागी झाले.सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक पक्ष्यांसोबत स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची ओळख जानेवारी फेब्रुवारीच्या निरीक्षणात देण्यात आली.यावेळी दुर्बिणीच्या साहाय्याने पक्षी फुलपाखरे ओळख,इंग्रजी मराठी नावे,त्यांचे नर मादी रंग आकार फरक इत्यादी विस्तृत माहिती दिली.
पाचही तलावावर एकंदर 8 प्रकारचे स्थलांतरित तर 26 प्रकारचे स्थानिक पक्षी विद्यार्थ्यांना बघायला मिळाले.तसेच ग्रीनफ्रेंड्सच्या चमुद्वारे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 40 च्या वर तलावावर स्थलांतरित पक्षी निरीक्षण करण्यात आले. स्थलांतरित पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती ज्यात यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच आढळलेला ग्रेटर स्कुप व मोठा स्वरल बदक ,त्याचबरोबर कलहंस,राजहंस, मोठी लालसरी, साधी लालसरी,नक्टा, तलवार,गढवाल, गार्गेनी,चक्रवाक, चमचाचोच,वूली नेकेड स्टॉर्क,ऑस्प्रे,रंगीत करकोचा ,कॉमन टिल इत्यादी प्रजातीचे स्थलांतरित पक्षी दर्शन स्थानिक बदक व पक्ष्यासोबत विद्यार्थ्यांना घडले.
गुरूकुल आयटीआयचे विद्यार्थी नाशिक बारस्कर,पौर्णिमा कांबळे, वैभव झंझाड,सोहेल वंजारी, प्रणय भजनकर,आयुष गभने, मयुर ढवळे, अनिकेत ढवळे,गौरव वैद्य, सायली मेश्राम, मयुर तांडेकर, बबली बारस्कर, सानिया पटले, युगांत खोब्रागडे, आनंद मोटघरे आयटीआय निदेशक डुंभरे, तसेच राणी लक्ष्मी विद्यालयाचे सुहानी पाखमोडे,नयना पाखमोडे,भूमेश्वरी पाखमोडे, राणी मल्काम,ट्विनकल धरमसारे, ओंकार आगलावे,आराध्या आगलावे इत्यादींनी सहभाग नोंदविला.
सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,श्री हॉस्पिटलचे डॉ योगेश गिर्हेपुंजे, अशोका बिल्डकॉनचे नितीश नागरीकर,लाखनी नगरपंचायतचे सिटी कोआर्डिनेटर लीना कळंबे,आरएसएस प्रांतीय कार्यकारिणीचे प्रचारक से. नि.प्रा.राजेश दोनाडकर,अशोक लेलँड सेवानिवृत्त अभियंता सुधीर जोशी,नाना वाघाये,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर,ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य,अशोक नंदेश्वर, निसर्गमित्र पंकज भिवगडे,सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे,वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर मयुर गायधने, सलाम बेग,धनंजय कापगते ,नितीन निर्वाण इत्यादींनी सहकार्य केले.