कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी: पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील जवाहर नवोदय विद्यालय द्वारा स्पेस सेटिंग उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धांतंर्गत १०० मीटर दौड मध्ये मुलीमधून प्रथम भुवनेश्वरी शेंडे,द्वितीय वंशिका सावरकर,तृतीय आरुषी भागडकर,तर मुलांमध्ये (माध्यमिक गट) प्रथम अनिकेत पुरकाम,द्वितीय दीपांशू पंधराम,तृतीय लकी सोनबरसे,आणि (प्राथमिक गट) प्रथम दर्शन बर्वे,द्वितीय अनिरुद्ध शेंडे,तृतीय अनिकेत परतेती यांनी क्रमशः बाजी मारली आहे..,
स्लो सायकल स्पर्धा: (मुले) प्रथम प्रणव ढोंगे,द्वितीय अनिरुद्ध शेंडे,तृतीय यश डायरे,तर मुलींमध्ये प्रथम वंशिका सावरकर,द्वितीय त्रिवेणी सावरकर,तृतीय हर्षु पिल्लारे यांनी क्रमशः बाजी मारली आहे.
गीतगायन स्पर्धा: प्रथम दिशा करमकर,द्वितीय चांदणी सूर्यवंशी,तृतीय पूर्वी कोहळे…
वक्तृत्व स्पर्धा: प्रथम वैभव सहारे,द्वितीय सेजल कळमकर,तृतीय खुशी खंडाळे..
निबंध स्पर्धा: प्रथम यश डायरे,द्वितीय भुवनेश्वरी शेंडे, तृतीय वैभव सहारे…
चित्रकला स्पर्धा: प्रथम सक्षम सोनेकर, द्वितीय यश डायरे, तृतीय समीक्षा सोनटक्के या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक साक्षोधन कडवे आणि जवाहर नवोदय विद्यालयचे प्रा.मनोज कोसे,नलिनी मसाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर,शिक्षक नीलकंठ पचारे,प्रशांत पोकळे,दिलीप पवार,शैलेंद्र देशमुख,सतीश जुननकर,सौ.तारा दलाल,अमित मेश्राम,सौ.अर्चना येरखेडे,प्रा. अरविंद दुनेदार,प्रा.सुनील वरठी, प्रा.मोहना वाघ तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंदा कोठेकर,लिलाधर तांदूळकर, शराशिद शेख,मोरेश्वर दुनेदार यांनी सहकार्य केले.