युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नालंदा बुद्ध विहार साईनगर अमरावती परिसरात क्रांतीबा ज्योतिराव फुले जयंती, विद्यार्थी मेळावा, महिला मेळावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील दुसरे पुष्प म्हणजे विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
भरगच्च कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचचे उपाध्यक्ष विलास मोहोड हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.टी.बी.रामटेके पाली व बुद्धिझम विभाग प्रमुख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे धम्मपिठावर विराजमान होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक सर्वव्यापी व्यक्तिमत्व विद्यार्थी ते घटनाकार या विषयावर प्रा.टी.बी.रामटेके यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज ताराबाई मंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर मंडोधरे आणि पाहुण्यांचा, वक्त्याचा परिचय प्रमोद शंकरराव मेश्राम यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आचल अमोल डोंगरे हिने पार पाडले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता दरवर्षी करण्यात येत असते. त्यामधे विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला सादर केल्या.
प्रामुख्याने वल्लभी मेश्राम, दिव्या तेलमोरे, आरव रविकुमार मेश्राम, अहर्त प्रमोद मेश्राम, संचित विजय नंदेश्वर, वंश मंगेश मेश्राम, बोधिका भूषण मेश्राम, इशिका प्रितम रामटेके आणि वल्लभी प्रमोद मेश्राम, यांचे समूहाने बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, गाडगेबाबा यांचे आत्मकथण सादर करून नृत्य सादर केले तसेच सृष्टी दिलीप तेलमोरे, स्वरा चंद्रशेखर गजभिये, आणि लावण्या ओमप्रकाश रामटेके यांनी भीमगितावर समुहनृत्य सादर केले.
तसेच अद्विक अविनाश वासनिक, यशवंत आणि जयवंत सुनील मेश्राम, अण्वी रविकुमार मेश्राम, लावण्या ओमप्रकाश रामटेके, स्वराज राजेश खंडारे, यांनी भिमगिते सादर केले तर श्राविका सुरज मंडे, गौरी प्रशांत भगेवार, साची निलेश दांडगे, अनित्या गजेंद्र वानखडे, स्वरा गजभिये, कनिष्क आणि लुंबिनी प्रकाश खंडारे, सृष्टी तेलमोरे, मृणाली राजेश खंडारे, पृथ्वी शैलेश मोहोड, श्रेया लोणपांडे, स्वप्नील खडसे, साहील रवी खडसे यांनी बाबासाहेबांबद्दल आपले मनोगत धम्मपिठावरून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीेतेकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंच चे अध्यक्ष, सचिव सह सर्व पदाधिकारी व सदस्य, रमाई महिला मंडळ अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी व सदस्य आणि नालंदा बुद्ध विहार परिसरातील उपासक, उपासिका नागरीक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.