युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार येथुन जवळच असलेल्या रामगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन अंगणवाडी मदतनिस यांचा सत्कार करण्यात आला.
रामगाव येथील अंगणवाडी मदतनीस दुर्गाबाई लक्ष्मणराव घुगलमाने ह्या ३०एप्रिल २०२३ ला नियत वय मानानुसार सेवानिवृत्त झाल्या.त्यानिमित्य जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगाव कडुन त्यांचा शाल व साडी चोळी देऊन रामगाव च्या सरपंच छायाताई संजय घरडे यांच्या हस्ते तसेच डी.आर.जामनिक मुख्याध्यापक , प्रमिला थोरात स.शिक्षिका , अंजु वानखडे विषय शिक्षिका, बाळकृष्ण सोळंके स.शिक्षक, संगिता वसु अंगणवाडी सेविका, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडुभाऊ घरडे, संजय घरडे सदस्य, ग्रामपंचायत ,रामगाव, ताजणे पोलीस पाटील, सुभाष घरडे सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती, मनोज घुगलमाने ,गजानन घुगलमाने, किशोर निबाळकर, झिपरकर,राहुल वानखडे, सौ,वानखडे कल्पना पुणेकर, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य,तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गण उपस्थित होते.