गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात २४ हजार नवमतदार…

ऋषी सहारे

   संपादक

        गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील 24 हजार 26 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. यात 13 हजार 261 पुरुष तर 10 हजार 764 महिलांचा समावेश आहे.

             12 – गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

           या विधानसभा मतदारसंघातील 18 ते 19 वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव – 1715 पुरुष आणि 1365 महिला, एकूण 3080, आरमोरी-1848 पुरुष आणि 1544 महिला एकूण 3392, गडचिरोली 2784 पुरुष आणि 2287 महिला एकूण 5071, अहेरी 2102 पुरुष आणि 1509 महिला व एक तृतियपंथी असे एकूण 3612, ब्रम्हपुरी 2458 पुरुष आणि 2023 महिला एकूण 4481, चिमुर – 2354 पुरुष आणि 2036 महिला एकूण 4390 मतदारांनी नोंदणी केली आहे.