अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधी
दख़ल न्यूज़ भारत
सिंदेवाही : दिनांक ०३/०४ /२०२४ रोजी सिंदेवाही तालुक्यातील मौजा जाटलापूर गावाजवळ च्या रेल्वे रुळावर एका २५ ते ३० वर्षाच्या युवकांने आत्महत्या केली, सदर आत्महत्या करणार युवक कोण आहे? त्याने आत्महत्या का केली असे बरेच प्रश्न पोलीस प्रशासन समोर आव्हान म्हणून उभे होते, पण यापेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आत्महत्या करणारा युवक कोण या युवकांची ओळख पटल्या शिवाय सदर तपास पुढे जाणार नाही हे पोलीस प्रशासनला माहित आहे.
सदर मृतक तालुक्यातील गावातील तर नाही या साठी प्रत्येक गावात मृतकाचे फोटो पाठविले,पण मृतक हा तालुक्यातील रहिवासी नसल्याने मृतक बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
त्यामुळे मृतकाचा शोध घेण्यासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनला नवीनच रुजू झालेले पी एस आय अनिल चांदोरे, पी एस आय सागर महल्ले, सहकारी मंगेश मातेरे यांनी सिंदेवाही मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सी सी टी व्ही कॅमेरा मध्ये या युवकांचा शोध घेतला असता तो कॅमेऱ्यात दिसून आला.
सदर फुटेजच्या आधारे आपला तपास सुरु केला, हा युवक कदाचित बसने आला असेल म्हणून सिंदेवाही बस स्थानक मधील कॅमेराचे फुटेज बघितले असता तिथे तो सुद्धा तो दिसून आला. अनोळखी युवकांनी केलेली आत्महत्या पण या युवकला ओळखणार कुणीच नाही. अश्या बेताच्या परिस्थिती मध्ये पी एस आय अनिल चांदोरे या मृतकाची ओळख पटविण्यासाठी आपला अनुभवाचा कस लावत होते आणि आपल्या तपासाला गती देत सुरवात बस स्थानकाच्या परिसरामधील फळ विक्रेता पासून केली.
सर्वात प्रथम मृतकबाबत माहिती समोर आली की मृतकाने फळ विक्रेता दशरथ कवळे यांच्या दुकानातून केळी विकत घेतल्या.पण पैसे नसल्याने दशरथ यांच्या मोबाईल वरून फोन करून त्याच्या खात्यात फोन पे नि केळीचे पैसे जमा करायला सांगितले.केळीचे पैसे जमा झाल्यानंतर मृतक निघून गेला.मृतकाचा फोटो बघितल्यावर ही संपूर्ण माहिती दिली.
मृतकाच्या तपासात पी एस आय अनिल चांदोरे यांना महत्वाची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी आपली तपासाची चक्रे फिरविली. त्यामध्ये एका शाळेकरी विध्यार्थीने मृतक हा मौजा शिवणी गावात काही दिवस होता ही खात्रीदायक माहिती दिली.मग दोन्ही माहिती घेऊन व दशरथ कवळे यांच्या मोबाईल वरून केलेल्या नंबर वर फोन करून मृतकाची ओळख पाठविण्यास बोलविले, मौजा शिवानी मधील गुरूदास रामदास कुंभरे यांच्या पत्नीने मृतक हा तिच्या बहिणीचा नवरा असल्याची माहिती दिली.
सदर मृतकाची माहिती पुढील प्रमाणे समोर आली आहे,मृतकाचे नाव पुणेश्वर पुसाम उसेंडी असून तो मौजा जांभळी ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली मधील रहिवासी असून तो नागपूर मध्ये कंपनी मध्ये काम करीत होता. मृताकाला दारू पिण्याचे व्यसन असल्याने पती पत्नीत भांडणे होत.१५ दिवसांअगोदर भांडण झाल्याने मृतक व त्याची पत्नी हे दोघेही सिंदेवाही तालुक्यातील शिवणी इथे आपल्या साळभावाच्या घरी आले. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दोन दिवसा अगोदर मृतक व मृतकाच्या पत्नीत वाद झालं वाद झाल्यानंतर मृतक हा सिंदेवाहीला निघून आला व तो सिंदेवाही मध्येच भटकत होता अशी चर्चा होती.
दिनांक ०३/०४/२०२४ ला त्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.सदर घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस स्टेशन चे राऊत मेजर करीत आहेत.पण एक अनोळखी व्यक्ती तालुक्यात येऊन आत्महत्या करतो आणि त्याची ओळख पटविणे हे सर्वात महत्वाचे आणि अत्यंत क्लिष्ठ असे काम पोलीस प्रशासनचे असते.लोकसभा निवडणूकच्या काळात कायदा व सुव्यस्थाची जबाबदारी पार पाडीत असतांना ७२ तासाच्या आत मृतक व्यक्तीची ओळख प्रचंड अशी मेहनत घेऊन आपल्या बुद्धी कौशलाचा वापर करून आपल्या पोलीस कर्तव्याचा परिचय सिंदेवाही पोलीस प्रशासनाने दिला.
या मृतकाची ओळख पाठविण्याची कामगिरी पी एस आय अनिल चांदोरे, पी एस आय सागर महल्ले,सहकारी मंगेश मातेरे, राऊत यांनी पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शन मध्ये केली.