दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
चाकण : शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत देशाने प्रगती केली आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आढळराव पाटील यांना विजयी करायचे आहे.यासाठी शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे.’ असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
चाकण येथे शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाततील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,पर्यावरण विभागाचे संचालक नितीन गोरे, तालुका प्रमुख राजुशेठ जवळेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय बाप्पु पठारे, तालुकाप्रमुख विशाल पोतले, महिला आघाडी प्रमुख ज्योती आरगडे, आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन शिंदे यांचेसह शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आळंदी परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी राज्यातून ४५ वर खासदार निवडून देण्याचा शब्द महायुतीचे माध्यमातून दिला आहे. शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे २ लाख ५० हजारावर लीड देऊन विजयी करायचे आहे. यासाठी निवडणुकीत शिवसेना, युवासेना, महिला, आघाडी पदाधिका-यांनी दक्षता बाळगत कार्यरत रहावे असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकण बैठकीत केले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आळंदी शहर शिवसेनेचे वतीने शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचे हस्ते माऊलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.