जलयुक्त शिवार अभियान 2.0 शिवार फेरीचे नियोजन…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली, दि.30 : जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून सदर अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्या करिता 184 गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सदर अभियान यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्ध रित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ होणार आहे . विविध मृद व जलसंधारणाचे क्षत्रिय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या स्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे /उपचार गावात मोहीम स्वरूपात राबवून त्याचे अंमलबजावणी करणे करीता शिवार फेरीचे नियोजन आवश्यक आहे व त्यानुसार प्राथमिक आराखडे तयार करावयाचे आहेत .

ग्राम समितीच्या मान्यतेने गाव आराखडा करण्यात येईल. यामुळे सरपंच हे ग्राम समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहतील. ग्राम समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, महिला प्रतिनिधी, ग्रामसेवक व गावाशी संबंधित शासकीय क्षत्रिय कर्मचारी यांचा समावेश राहील.

जलसंधारण अधिकारी व कृषी पर्यवेक्षक हे समन्वयक म्हणून काम पाहतील. गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील गावांची संख्या पुढील प्रमाणे –

 

गडचिरोली – 8

धानोरा – 15 

चामोर्शी 11 

मुलचेरा – 9

वडसा -10 

आरमोरी -10 

कुरखेडा -9

कोरची -10

अहेरी-18 

एटापल्ली – 50 

भामरागड -11

सिरोंच्या -23

यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या अहेरी, ऐटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील कामांचा समावेश आहे.

शिवार फेरीला जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी व सर्व विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी हजर राहून गाव आराखडा तयार करणे बाबत सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली यांच्यामार्फत करण्यात आली आहे.