रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर:-
इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुप व आयआयटीई द्वारे घेण्यात आलेला संयुक्तपणे स्टुडन्ट मीट कार्यक्रम इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे पार पडला.
यावेळी इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुप अंतर्गत चंद्रपूर,वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखा मधले सुमारे 800 विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञानासोबतच सायबर विश्वातील गुन्हे आणि पॉक्सो कायदा या विषयांवर मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सुमित जोशी, पोलीस उपनिरीक्षक, कम्युनिटी सेल चे रोशन इरपाचे, सायबर चे मुजावर आली, संतोष पानघाटे तसेच आयआयटीई चे संस्थापक मोहसीन खान आदींनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी खोटी प्रोफाइल तयार करून अश्लीश संदेश-चित्रे पाठवणे,अकाउंट हॅक करणे,चॅटिंग करताना फसवणे,लग्नाच्या जाळ्यात अडकवणे,लैंगिक चाळे करणे तसेच फसवणूक करणे यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुभव प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी इन्स्पायर कम्प्युटर एज्युकेशन ग्रुपचे करुणाप्रिया वासनिक,अक्षय पानघाटे, कार्तिक टोंगे,राकेश पाल,मयूर गोठे,प्रीतम जांभुळे,राहुल रघाटाटे इत्यादी उपस्थित होते.