भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटने मार्फत नुकत्याच पार पडलेल्या या “फिडे ट्रेनर सेमिनार ” मध्ये गडचिरोली येथील रोशन सर चेस अकॅडमी चे संचालक रोशन नामदेव सहारे यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक परीक्षा पास केली आहे रोशन यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पाहिले राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक झाले आहे.५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत राजस्थान जयपूर येथे देशातील निवडक अनुभवी बुद्धिबळ प्रशिक्षकाना प्रशिक्षण दिले. राजस्थान बुद्धिबळ संघटनेचे सचिव अशोकजी भार्गवा यांनी हा सेमिनार आयोजित केला होता. यात फिडे ट्रेनर सेमिनार मध्ये भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात या राज्यातील एकूण २२ प्रशिक्षक सहभागी झाले होते.
या फिडे- जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अनुभवी बुद्धिबळ प्रशिक्षक फिडे सिनियर ट्रेनर भारताचे तिसरे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि फिडे ट्रेनर इंटरनॅशनल मास्टर शरद टिळक यांनी मोलाचे प्रशिक्षण दिले.
फिडे- वर्ल्ड चेस फेडरेशन चे प्रशिक्षक पोझिशन थीम आणि तंत्रज्ञानाचा वापर या प्रमुख पैलूंवर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण, परीक्षा आणि सेमिनारचा उद्देश म्हणजे की देशातील आणि परदेशातील उच्च खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना वेळोवेळी आत्मज्ञानाची आवश्यकता असते ज्यामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता तर सुधारतेच शिवाय देशातील उदयोन्मुख तरुण खेळाडूंसाठी खेळाचा स्तर सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापरही होतो. तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर फिडे च्या प्रशिक्षकांची शाखा फीडे ट्रेनर कमिशन तर्फे सर्व प्रशिक्षकांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आली.सर्व प्रशिक्षकांना त्यांच्या अनुभव, ज्ञान आणि क्रीडा पातळीनुसार प्रशिक्षक पदव्या (Fide Titles) देऊन २५ मार्च ला निकाल जाहीर करण्यात आले.
त्या मध्ये रोशन नामदेव सहारे यांनी या परीक्षेत चांगले गुण घेऊन परीक्षा पास केली व त्यांना राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून पदवी देण्यात आली.
रोशन सहारे यांना फीडे वर्ल्ड चेस फेडरेशन मार्फत राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून निवड झाल्या मुळे गडचिरोली क्रीडा विश्वात आनंद पसरला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. रोशन हे मूळचे धानोरा तालुक्याचे असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील विभा व नामदेव सहारे , डॉ. अप्पलवार परिवार व मार्गदर्शन नाशिकचे ओंकार जाधव सर, नागपुर चे प्रवीण पानतावणे सर आणि दीपक चव्हाण सर यांना दिले आहे. तसेच गडचिरोली अम्युचर चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन ने यांचे अभिनंदन केले आहे