दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : संत विचार प्रबोधिनी पुणे व डॉ.रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वै.डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये किर्तन सेवेसाठी हभप श्री अमृताश्रम स्वामी महाराज तसेच लोक कला सेवेसाठी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी असुन रविवार दि. ७ एप्रिल रोजी पुण्यातील लेडी रमाबाई सभागृहात या पुरस्काराचे वितरण वेदांत सत्संग समितीचे डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठमुर्ती शास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप उपस्थित राहणार आहेत. या अभुतपुर्व सोहळ्याला गुरुवर्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहे. असे डॉ.रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे यांनी सांगितले आहे. यावेळी अवधूत गांधी व ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सांप्रदायिक पंचपदी व अक्षता इनामदार यांचे पोवाडा गायन होणार आहे.