राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्यामुळे जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये आदिवासी मुलांना प्राधान्य दिले जाते,व बाकीच्या सवर्गाना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते.
या वेळेस काढलेल्या जाहिरातिमध्ये EWS व OPEN मधील विद्यार्थ्यांना कुठलेही आरक्षण दिले नव्हते.
कोरची, कुरखेडा, व जिल्ह्यातील शेकडो तरुणानी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांची भेट घेऊन सदर झालेला अन्याय लक्षात आणून दिला.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिहं चंदेल यांनी वेळ न घालविता शिवसेना महिला जिल्हा संघटीका छाया ताई कुंभारे ,जोत्सना राजूरकर शेकडो पोलिस भरती साठी तयारी केलेल्या बेरोजगार युवकांनी व आपल्या पदाधिकारी यांचे सोबत गडचिरोली येथे जाऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले होते व त्यात उल्लेख केला की जर EWS व OPEN मधील मुलांना या पोलीस भरतीमध्ये स्थान न मिळाल्यास तीव्र आंदोलनाला प्रशासनास समोरे जावे लागेल.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन आजच नवीन शुद्धीपत्रक जाहिरात काढली असून त्यात EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना स्थान मिळालेले आहे.हे शिवसेनेच्या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल व पदाधिकारी यांचे आभार मानले आहे.