दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
ब्रम्हपुरी :- देशाची भविष्य मानले जाणारी युवा पिढी सामजिक कार्याला आपल्या जिद्दीने व चिकाटीने पुर्ण करण्यास सदैव तत्पर असतात.
राष्ट्रहिताचे कार्य करणे किंवा सामजिक कार्य करणे सोपं नाही. त्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे वेळ आणि कार्य करण्याचा सामर्थ, अशात ब्रम्हपुरी तालुक्यात जिवंत उदाहरण देणारे सामाजिक संघटन म्हणजेच रक्तविर सेना युवा वर्गाच्या एक्किने स्थापन करण्यात आलेले संघटन अनेक वर्षापासून अहो रात्र जनसेवेत लागलेला आहे.
ब्रम्हपुरी येथिल विश्राम गृहात दि.12 मार्च ला संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष निहाल ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
निहाल ढोरे म्हणाले, युवा वर्गाला प्रत्येक क्षेत्रात संधी प्राप्त व्हावी, या हेतूने संघटन प्रयत्न करीत असते. माञ स्थानिक नेत्यांच्या आश्वासने युवा पिढी बेरोजगारीचे दिवस मोजत आहे. निवडणूक आली की मोठे नेते येतात आणि लंब्या पोकळ आश्वासनाची पूर्तता करुन जातात.
समाजात अनेक प्रश्न आहेत ज्याचे कधीही उत्तर ह्या नेत्यांना मिळाले नाही. युवा बेरोजगारी, शेतकरी, महिला, विद्यार्थी व वृद्धांच्या समस्यांनी लाजवेल अशी परिस्थिती निर्माण करुन ठेवलेली आहे.
नौकरी घोटाळा, रेती- माती- मुरुम घोटाळा, घरकुल योजना घोटाळा व जमीन घोटाळे अशा अनेक घोटाळ्यांना स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद मिळत आहे. याला आळा घालण्यासाठी रक्तविर सेना लोकसभेचा मैदान गाजविणार असे निहाल ढोरे यांनी घोषित केले.
संघटनेचे उपाध्यक्ष मायासिंग बावरी, सह-सचिव रूपम शिऊरकार, कोषाध्यक्ष प्रणय ठाकरे यांनी सुध्दा बैठकीला संबोधित केले.
यावेळी बैठकीला मंगेश फटिंग,रोहित राऊत, सचिन तलमले, कुणाल ठाकरे, संदेश बगमारे, योगेश राऊत, अमित नाकतोडे, तुषार भागडकर, समिरसिंग भुरानी,कांचन ठेंगरी, गौरव करंबे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.