खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी आहे : डॉ.सुनिल वाघमारे.. — जागतिक महिला दिनानिमित्त रेश्मा धावडे यांचा विशेष सत्कार… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी – खेळाचा आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना पूरक आहेत. खेळण्यासाठी आरोग्य चांगले, तंदुरूस्ती लागते. त्यामुळे खेळाडूला अधिक बळ मिळते. खेळाडू हे मैदानावर असोत की मैदानाबाहेर सर्वसामान्य जीवनात असोत, खेळ खेळणारे असोत की निवृत्त झालेले असोत ते नेहमीच उर्जावान, उत्साही दिसतात. खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी असल्याने पालकांनी पदकांसाठी नव्हे तर शाररीक तंदुरूस्तीसाठी आपल्या मुलांना कोणत्याही खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन इंद्रायणी सेवा फौंडेशनचे सचिव डॉ.सुनिल वाघमारे यांनी आज येथे केले.

         जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने खेळात विशेष प्राविण्य प्राप्त करुन पोलिस दलात कार्यरत रेश्मा धावडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

         याप्रसंगी धावडे यांनी अतिशय खडतर प्रवास करत क्रिडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करून पोलिस दलात कार्यरत आहेत त्यांचा हा प्रवास नक्कीच तरुणांना स्फूर्ती देणारा आहे असे मत डॉ.वाघमारे यांनी सांगितले. यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.