कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील सामाजीक वनीकरण विभागाच्या नवेगाव खैरी येथिल रोपवाटिका येथे आज विभागीय वनाधिकारी संदीप क्षिरसागर (सामाजिक वनीकरण विभाग) नागपूर यांनी रोपवाटिका नवेगाव खैरी येथे आज सायंकाळी पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय आदर्श विद्यालय द्वारा संचालित संगठन राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने प्रमुख पाहुणे विभागीय वनाधिकारी संदीप क्षिरसागर (सामाजिक वनीकरण विभाग) नागपूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
तसेच याप्रसंगी पारशिवनी तालुका वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके,वरिष्ठ वनपाल विजयराव येरपुडे,मनोहर शेंडे,राष्ट्रीय हरित सेनेचे श्री.सक्षोधन कडवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
“निसर्ग वाचवा देश वाचवा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयावर सविस्तर चर्चा करून पर्यावरण व संरक्षण विषयी विभागीय वनाधिकारी संदीप क्षिरसागर (सामाजिक वनीकरण विभाग) नागपूर याची मोलाचे मार्गदर्शन केले .