कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी : – पारशिवनी पोलीस स्टेशन जवळील तामसवाडी गाव लगतच्या कन्हान नदी पात्रातुन एक ब्रास रेती टॅक्टर जप्त करून फौजदारी कारवाई केली आहे.
पारशिवनी पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस पथकाचे उपनिरिक्षक राजेश पिसे यांनी विना राॅयल्टी वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरला पकडुन ०६ लाख ०३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व चालक-मालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२९) ला १:३० वाजताच्या दरम्यान पारशिवनी पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि टॅक्टर तामसवाडी गाव लगत कन्हान नदीच्या पात्रातुन रेती भरून गावाकडे अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करीत आहे.
अश्या मिळालेल्या माहिती वरुन पारशिवनी पोलीसांनी चौक येथे नाकाबंदी केली असता एक टँक्टर ट्रालीत रेती भरून गावाचे दिशेने येत असतांना दिसुन आला.पारशिवनी पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक राजेश पिसे यांनी त्यास थांबवुन परिचय देऊन पाहणी केली असता टॅक्टर मध्ये एक ब्रास वाळु दिसुन आल्याने पोलीसांनी टॅक्टर चालकाला वाळु बाबत राॅयल्टी विचारली असता १ ब्रास वाळुची राॅयल्टी वाहन चालक मालकच्या जवळ नसल्याचे दिसून आले.
यामुळे राॅयल्टी नसल्याचे चौकशी दरम्यान दिसुन आल्याने पारशिवनी पोलीसांनी १) टॅक्टर क्रमांक एम.एच.४०,सि.ए.१९४९ ट्राली सह किंमत ६ लाख रुपये,२) अंदाजे १ ब्रास वाळु प्रत्येकी ३.००० प्रमाणे ०६ लाख ३ हजार रुपये,असा एकुण ६ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर प्रकरणा बाबत पारशिवनी पोलीसांनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवने यांचा मार्गदर्शनात पो.उपनि. राजेश पिसे यांनी कार्यवाही करून आरोपी १) चालक-मालक यांचा विरुद्ध अप क्रमांक ७२/२३ कलम ३७९ ,१०९ भांदवि सहकलम ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवने यांचा मार्गदर्शनात पारशिवनी पोलीस हवालदार सुरेश धुर्वे हे करीत आहेत.