कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील मध्यभागी असलेल्या पारशिवनी शहर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय समोर एक दिवशीय काम बंद करून संपाचे आयोजन आज सोमवारला करण्यात आले. सोमवार दि. २६/०२/२०२४ रोजी एक दिवसाचा लक्षणीक संप बाजार समितीचा कार्यालयात येथे करण्यात आले.
या संपा मध्ये मागणी नुसार सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पूणे यांचे पत्र जा.क्र. १२९ दिनांक २२/०२/२०२४ पत्राच्या अनुषंगाने सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने बाजार समिती सिमांकीत बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, उपबाजार तळ निर्माण करणे यामुळे आडते, हमाल, मापाडी, बाजार समित्या इत्यादी घटकांवर शासनाने सध्याचे कायद्यात बदल करु नये म्हणून हा संदेश देण्याकरिता आज सोमवार दि. २६/०२/२०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनी तर्फे सोमवार दि. २६/०२/२०२४ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारशिवनी एक दिवस लाक्षणीक संपामध्ये सहभागी झाले होत. त्यामुळे दि. २६/०२/२०२४ रोजी बाजार समितीचे कार्यालय व सर्व प्रकारचे शेती मालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते.
जुन्या कायद्यात बदल करू नये नवीन कायद्याच्या नूसार कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनी च्या सर्व घटकावर परिणाम होणार असल्याने एक दिवशीय लक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अशोक चिखले सभापती, सुभाष तडस उपसभापती, मोहन राऊत व्यापारी गट संचालक, चन्द्रशेखर शेळके सचिव, उमेश सरिले, उतम ढोबळ, प्रणय झाड़े, मोरेश्वर पिं परामुळे, ऋषी नेवारे, शेखर राऊत सह कर्मचारी, अडते, हमाल, मापडी आदी प्रामुख्याने धरणे आंदोलनात उपस्थित होते.