ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहेत.आरमोरी तालुक्यात पक्ष संघटन मजबूत होत असून असंख्य लोक पक्षात प्रवेश करत आहेत.
दिनांक २४/०२/२४ मौजा पलसगाव येथे हिंदू हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ना.एकनाथजी शिंदे यांचे आदेशानुसार विदर्भ संगठन प्रमुख किरण पांडव, जिल्हा संपर्क प्रमुख संदिप बरडे(पाटील) यांचे मार्गदर्शनाखाली आरमोरी विधानसभा क्षेत्र सहसंघटक शैलेंद्र कोहाले , आरमोरी तालुका अध्यक्ष मधुसूदन चौधरी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रमुख महेश कुथे, यांचे उपस्थितीत आकेश हजारे , श्रीमती लक्ष्मी खोब्रागडे, जगदीश हजारे, रोशन बुल्ले, जगदेव पिलारे, तुषार गोन्दोले, सुधीर मने, किरण तितीरमारे , दादाजी लठ्ठे, चांगदेव बावने, आशिक कांबले, गौरी शंकर हजारे, अनिल वैद्य यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शिवसैनिक कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे.