युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले वार्ड क्रमांक तीन जिल्हा परिषद मराठी रामनगर शाळा या शाळेचे कंपाउंड चे बांधकाम सुरू आहे.
परंतु दर्यापूर तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारे शासनाने रेतीघाटचा लिलाव केला नसल्यामुळे शासकीय कामावर अवैध रेती आली कुठून हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झालाय. लहानशा चिमुकल्याची हे जिल्हा परिषद शाळा असून यामध्ये लहान लहान मुले शिकत असतात.अशाप्रकारे अवैध रेतीचा वापर करून माती मिक्स रेती असून काही दिवसात हे बांधकाम पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
तरी या संबंधित बांधकाम ठेकेदारावर महसूल विभागाने गुन्हे दाखल करावे. ठेकेदाराने ज्याच्याकडून रेती बोलावली त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करून त्याचे वाहन सुद्धा जप्त करावे. या प्रकरणात महसूल विभागांनी किंवा दर्यापूर तहसीलदार यांनी गंभीर दखल घेऊन दोषीवर कारवाई केली कि नाही किंवा थातूरमातूर कारवाई करण्यात जर आली तर यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत येवदा गावचे पटवारी नागरे यांनी या संदर्भात पंचनामा करून रेती साठा जप्त केला व यामध्ये येवदा गावची ग्रामपंचायत सुद्धा भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येत आहे पुढील कारवाई दर्यापूर तहसीलचे तहसीलदार हे करीत आहे.