सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधि
‘कही हम भुल न जाये ‘अभियान अंतर्गत महापुरुषांच्या विचारांची शिकवण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी तसेच त्यांनी सांगितलेला सामाजिक वसा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला सांगितला जात असते.
असेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या औचित्याने सावली येथील समाज मंदीराच्या प्रांगणात दि.२५ फेब्रुवारी२०२४ रविवार ला साय.६ वा. प्रबोधनात्मक गीतगायनाचा (कव्वाली) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रेस क्लब तालुका सावली आणि मित्र परीवार द्वारा आयोजित प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमात रेडिओ आणि लॉर्ड बुध्दा.टि.व्ही.सिंगर ,राष्ट्रीय गायीका क्रांती मिनल आणि संच काटोल (नागपूर) यांचा कार्यक्रम राहणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,तर अध्यक्ष म्हणून सावली शहर कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष तथा नगरसेवक विजय मृत्यालवार,दिप प्रज्जवलन नगर सेवक प्रफुल्ल वाळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजक प्रेस क्लब सावली आणि मित्रपरिवार कडून आवाहन करण्यात येत आहे..