प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
राज्य सरकारने 65 हजार प्राथमिक शाळा उद्योगपतींना दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात व कमी पटाच्या 14 हजार 800 शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आणि सर्व शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे,” शाळा वाचवा-शिक्षण वाचवा- शिक्षक वाचवा,अभियानांतर्गत शिक्षण,पेन्शन,आरक्षण वाचविण्यासाठी सरकारी धोरणाच्या निषेधार्थ,”राज्यस्तरिय शिक्षण-पेन्शन-आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र,यांच्या वतीने राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
या महामेळाव्यासचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार,(अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) हे करणार असून मेळाव्याची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करणार आहेत.
या मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार उपस्थित राहणार आहेत.अमहदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये या महामेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हास्तरीय शिक्षण-पेन्शन-आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने बैठका संपन्न झाल्यात.यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शिक्षक बांधव मेळाव्यासाठी जातील असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हा बैठक वेळी श्री.रमेश मकासरे (राज्य सरचिटणीस प्रोटान संघटना),श्री. एकनाथ व्यवहारे (जिल्हाध्यक्ष बहुजन मंडळ),श्री.प्रवीण दादा ठुबे ( महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट),श्री.प्रकाश नांगरे ( महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट), श्री.नानासाहेब गाढवे (जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना अहमदनगर),श्री. नानासाहेब बडाख (व्हा.चेअरमन शिक्षक बँक ),श्री. तौसिफ़ सय्यद( उर्दू शिक्षक संघटना अहमदनगर),माध्यमिक शिक्षक संघटनेचे श्री.अकोलकर, श्री.रमेश पगारे,बामसेफचे डॉक्टर भास्कर रणनवरे,सचिन ढगे,संतोष रोकडे,बाबासाहेब थोरात,इंजि.संजय शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.