कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी व किलबिल स्ले स्कूल पारशिवनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चना भोयर व सभापती सौ मंगला नीबोंने चंद्रकांत देशमुख सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी.हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पार पडले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाकिर शेख,सदस्य गोपाल कडू,उदाराम सोनकुसरे,संघपाल गजभिये,विनोद रेवतकर,गौतम सावरकर,सचिन देशमुख,सौ.ममता पाटील केंद्र प्रमुख,सौ.प्रतिभा कुंभलकर माजी नगराध्यक्ष,सौ.चंद्रकला ठाकरे,सौ.माधुरी तांदूळकर,सौ.प्रतिक्षा बीसन,सौ.शालिनी चाचेरे,सौ.ज्योती भलावी,डॉ.इरफान अहमद शेख, रविंद्र पाटील तरार उपस्थित होते.
१३ फेब्रुवारी २४ ते १६ फेब्रुवारी २४ दरम्यान आयोजित स्नेह सम्मेलनात विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन,सांस्कृतिक कार्यक्रम,समुह गायन,नृत्य स्पर्धा,रांगोळी व चित्रकला स्पर्धा आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
दिनांक १६ फेब्रुवारी ला सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना दिपक भोयर, सभापती सौ.मंगला उमराव नीबोंने,डॉ.इरफान अहमद शेख,गोपाल कडू, मुख्य अध्यापिका सरिता चरेवितकर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ.सरिता चोबीतकर यांनी प्रास्ताविक केले.
सौ.अर्चना दिपक भोयर जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समीली सभापती मंगला उमराव निबोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शालेय परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली गिते शिक्षिका यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ सरिता चोबीतकर मुख्याध्यापिका यांच्या कुशल मार्गदर्शनात सौ.मंजुश्री खवले,सौ संगीता चरडे,सौ.कविता मोहजनकर,सौ संगीता ठाकरे,सौ.माधुरी दलाल,सौ सुप्रिया कुरळकर,
आकाशा कोटगुले,सौ.मंगला वैरागडे,सौ.उर्मिला चोपकर,सौ.कुंदा लुथडे,प्रकाश वैरागडे यांनी परिश्रम घेतले.