रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :-
गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर व्दारा संचालित राष्ट्रासंत तुकडोजी महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशन तर्फे संशोधन पध्दती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल सर, मुख्य मार्गदर्शक डॉ. अनिता महावादीवार,वाणिज्य विभाग प्रमुख,भिवापूर महाविद्यालय,भिवापूर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड,मराठी विभाग प्रमुख प्रा.कार्तीक पाटील सर यांची उपस्थिती होती.
या दरम्यान
प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल सर यांनी संशोधन क्षेत्राच्या कार्यपध्दतीवर विस्तृत मार्गदर्शन केले.डॉ. अनिता महावादीवार यांनी संशोधन क्षेत्र व्यापक करण्याकरीता समस्येचे आकलन व निराकरण करण्याकरीता संशोधकाची भुमिका व विद्यार्थ्यांना संशोधन करीत असतांना त्यांचा आराखडा कसा तयार करावा तसेच शोध प्रबंध तयार करत असतांना महत्वाचे मुद्दे सांगितले. डॉ. प्रफुल बन्सोड सर व प्रा. कार्तीक पाटील यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.हरेश गजभिये वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.निखील पिसे तर आभार कु.गौरी कुळमेथे यांनी मानले.
कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता डॉ.लक्ष्मण कामडी, प्रा.चेतन चौधरी व प्रा.रूपाली बरडे यांनी सहकार्य केले.