महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदे तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नेरी ला.. — १८ फेब्रुवारीला होणार कार्यशाळा.. — महत्वपूर्ण संधी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका 

  चिमूर व सिंदेवाही तालुका केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोशियन द्वारा एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथे करण्यात आले आहे.

        चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील समस्त फार्मासिस्ट बंधु व भगिनींच्या हितासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदे तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिं. 18/02/2024 रोज रविवारला चिमूर तालुक्यातील नेरी येथील गुरुदेव सेवा मंडळ, नेरी येथे करण्यात आलेले आहे.

       जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. गोपाल भाऊ एकरे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे.

        या कार्यशाळेचे उद्घाटन आपना सर्वांचे आधारस्तंभ आदरणिय श्री.मुकुंद भाऊ दुबे ( उपाध्यक्ष एमएससीडीए ) यांच्या हस्ते होणार आहे.

         या कार्यशाळेचे सहउद्घाटक म्हणून गुरुदेव भक्त श्री.मिलिंद भाऊ गंपावार ( संघटक नागपुर झोन ) उपस्थित असणार आहेत.

           या कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान जिल्ह्याचे लाडके नेतृत्व श्री.गोपाल भाऊ एकरे सांभाळतील तसेच प्रमुख अतिथी म्हणून MSPC सदस्या सौ.सोनालीताई पडोळे,सर्वश्री.हरिशजी गणेशानी,सचिनजी चिंतावार,रविभाऊ आसुटकर, अनुपजी वेगिनवार आदि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

        सदर कार्यशाळा ही फार्मासिस्ट मंडळींनी अपडेट राहण्यासाठी व व्यवसाय कौशल्य प्राप्त करण्यासाठी आहे.

       या कार्यशाळे करिता आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आदरणिय श्री. मनिष चौधरी साहेब आवर्जून उपस्थित राहून आपणास मार्गदर्शन करणार आहेत.

        बुलढाणा जिल्ह्या वरून MSPC चे माळी सर व त्यांची टीम आपणास प्रशिक्षण देणार आहेत.

      तरी चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील समस्त फार्मासिस्ट मंडळीना नम्र विनंती आहे की कृपया आपण मोठया संख्येने सहभागी होऊन या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

    अशी संधी वारंवार मिळत नाही याची नोंद घ्यावी.

**

टिप :- 

१)कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच apron परिधान करून येणे बंधनकारक आहे.

         ज्या कुणाकडे apron नसेल अश्या अपवादात्मक मंडळींनी सफेद शर्ट परिधान करून यावे.

२)नोंदणी साठी रजिस्ट्रेशन क्रमांक आवश्यक असल्याने आपण आपल्याकडे असलेले PPP Card आणावे.

३) नोंदणी त्याचदिवशी कार्यशाळा स्थळी करण्यात येईल त्याकरिता नोंदणी शुल्क १०० रू.आहे.

      — आपले विनीत —

            श्री.अजय कृ.चौधरी

          (तालुका अध्यक्ष चिमूर)

          श्री.स्नेहदीप म.खोब्रागडे

           (तालुका सचिव चिमूर)

           श्री.प्रवीण जयस्वाल

         (तालुका अध्यक्ष सिंदेवाही)

             श्री.प्रशांत देवळीकर

         (तालुका सचिव सिंदेवाही)