ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली -प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा यांच्या सौजन्याने व साकोली संघटनेच्या वतीने लवारी/ उमरी येथे जिल्हास्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन दि.२३ व २४ फेब्रुवारीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय लोककलाकारांचा मेळावा व लोककला महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 23 ला सकाळी ११ वाजता पद्मश्री डॉ. परशुरामजी पुणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे नरेश नगरीकर सरपंच ग्रा.प. लवारी ,मदनभाऊ रामटेके सभापती समाज कल्याण भंडारा, कमलेश पाटील अध्यक्ष प्रबोधनकार कला साहित्य ,निलेश कदम तहसीलदार साकोली, रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक साकोली ,गणेश आदे सभापती पं. स. साकोली तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी( दि.२३)ला दुपारी ३ वाजेपासून कलावंत आपले कला सादर करतील यात नाद गंधर्वाचा मराठमोळी लावणी ,राष्ट्रीय खडा गोंधळ ,आदिवासी गोंडी नृत्य, महिलांची दंडार ,तमाशा, समाज प्रबोधन ,किर्तन ,नाट्यसंगीत, दृष्टीहीन मुलांचा आर्केस्ट्रा, कलापथक ,भजन ,डहाका तसेच सर्व स्तरावरील कला सादर होणार आहेत . रात्री ९ वाजता ‘रुसला पदर मायेचा ‘ही तीन अंकी नाटक सादर करणार असून या कार्यक्रमाला कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात सुरमा बारसागडे (शाहिरा), हिरालाल शहारे ,आर्यन नागदेवे(शाहिर), छगन पुस्तोडे (ज्येष्ठ नाट्य कलावंत) राम महाजन (जेष्ठ कवी साहित्यिक) भोजराम मेश्राम भोजू भाऊ वाटगुरे (ज्येष्ठ कलावंत) उत्तम मेश्राम (नाट्य कलावंत )कृपाल लंजे (बेबस चित्रपट अभिनेता) भोजराम कापगते (जेष्ठ कलावंत) रुपेश खोब्रागडे (कव्वाल भंडारा)शनिवार दिनांक २४ ला सकाळी ११ वाजता कवी संमेलन संमेलनाध्यक्ष राहुल तागडे राहतील. रात्री ७ वाजता समारोपीय कार्यक्रमात भुमाला उईके जि प सदस्या, माहेश्वरी नेवारे जि प सदस्या, लताताई नरवले जि प सदस्या, दीपलता समरीत जि प सदस्या ,वनिता डोये जि प सदस्या ,यशवंत कापगते सरपंच उमरी, जयश्री पर्वते सरपंच परसोडी, साकोली पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस, डी जी रंगारी ,रवी भोंगाने, ताराचंद कापगते ,मनीषा काशीवार, आशिष चेडगे ,शाहिद कुरेशी ,पत्रकार सुनील जगीया, पत्रकार ऋग्वेद येवले, पत्रकार संतोष कोरे ,संजय साठवणे, किशोर गडकरी, संजय भांबोरे, नाजीम पाशा ,नाजीम पठाण आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भावेश कोटांगले, राकेश वालदे, मनोज कोटांगले, मनोज बोपचे, संजय टेंभुर्णे, ईश्वर धकाते, यशवंत बागडे ,धनंजय धकाते ,मनोहर गंधाळे ,प्रल्हाद भुजाडे ,दिनेश टेंभरे ,विनोद मुरकुटे व आयोजन समितीने केले आहे.