
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद सर्कल जिल्हा परिषद सदस्या अर्चना दिपक भोयर व पंचायत समिती सदस्य यांनी अवकाळी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या कापूस,चना, गहू पिकाच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला नुकसान बाबत मौका चौकशीची मागणी केली व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबत वास्तविकता पुढे आणली.
यासाठी शेतात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसान पाहणी केली.नंतर कृषी अधिकारी,तहसिलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी केली.