बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लुमेवाडी तालुका इंदापूर येथे आठ कोटी वीस लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत असताना म्हणाले की लुमेवाडी येथील सुपी संत बाबांचा आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे मी आमदार झालो मंत्री झालो म्हणूनच इथून पाठीमागे विकास कामासाठी निधी देऊन काही कामे पूर्ण झाली तर मंजूर झालेल्या कामाचे आज उद्घाटन बाबाच्या साक्षीने माझ्या हातून होत आहे. खरा मामा आहे म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे मी जे बोलतो तोच शब्द देतो ते करूनच दाखवतो आज भूमिपूजन केलेली सर्व कामे लवकरच चालू करून पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ. पुन्हा आज बाबांच्या चरणी मी नतमस्तक झालो आसाच आशीर्वाद इथून पुढेही मला लुमेवाडी येथील जनतेने मतदान रूपाने द्यावा.
माजी सरपंच उस्मान शेख यांनी आनेक नवीन कामाच्या मागण्या मागितल्या त्यापैकी , व्यायामासाठी जिम लगेचच आठ दिवसातच बसवून देतो , बंधाऱ्याच्या लेकीच कामाची आडचण आसेल तेही काम लवकरच मार्गी लावतो ज्याच्या नवीन मागण्या आसतील त्याही मंजूर करण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. बाबांच्या साक्षीने सांगतो की थापा मारून जान हे मला आवडत नाही . गावासाठी संपूर्ण विकासची कामे केल्याशिवाय गप्प बसणार नाही आमदार दत्तात्रय भरणे यांचे उद्घाटन प्रसंगी उदगार .
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे माजी सरपंच उस्मान शेख यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत होले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऊप जिल्हाध्यक्ष नवनाथ रुपनवर, साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके, सरपंच दादासाहेब शिरसागर, सरपंच पांडुरंग डीसले, मा .सरपंच नरहरी काळे, ऊप सरपंच सरपंच संतोष सुतार, सरपंच पोपट जगताप, सरपंच प्रतिनिधी सुनील जगताप, राष्ट्रवादी कार्यकर्ता नूर मोहम्मद शेख, सहित लुमेवाडी येथील सर्वच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
इथून पुढच्या येणाऱ्या विधान सभेला लुमेवाडी गावातून दत्तात्रेय भरणे मामा यांना सातशे मतांनी लीड मिळणार तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे