कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड पानतावने काॅलेज जवळ ३१ डिसेबरला बंद घरातुन एकुण ४ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल
चोरुन नेणाऱ्या दोन आरोपींना ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांचा जवळून पुर्ण माल हस्तगत केला व परत गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.३१) डिसेंबरला अनमोल शिखासन चव्हाण वय ३५ ,रा.कन्हान हे मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचार कामी गेले होते.
अनमोल हा आपल्या घराला लॉक लाऊन सायंकाळी सहा वाजता दरम्यान मेयो रुग्णालय नागपूर येथे गेला होता.रात्री १ वाजताच्या दरम्यान अनमोल चौहान घरी परत आला असता तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघळला दिसला.
अनमोल ने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता घरातील गोदरेज कंपनीची अलमारी उघडली दिसली व त्या मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत ३ लाख ४२ हजार ४००,रुपयांचे तर चांदिचे दागिने २२ हजार २०० व नगदी ८० रुपये असा एकुण ४ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होतीअज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक तयार करुन आरोपी शोधण्यास सुरूवात केली असता पोलीसांना समजले की,गुन्ह्यात घरफोडी करण्याकरीता लाल रंगाची पल्सर गाडी वापरण्यात आली होती.
या वरून आरोपी पर्यंत पोलीस पोहचणार असा सुगावा लागताच आरोपींनी पल्सर गाडी लपवून कन्हान शहरातुन पसार झाले.कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस सदर घटनेचे आरोपी शोधकामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी ने पल्सर गाडी कुठे ठेवली व आरोपी कुणासोबत फिरला याची गोपनीय माहीती मिळाली.
या वरून सदर आरोपी दुर्ग ( मध्यप्रदेश)ला असल्याचे कळले.सदरची माहीती वरिष्ठांना देऊन अट्टल चोरटे असल्याने एक टिम तयार करण्यात आली.त्याच दिवशी या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागीने आरोपीने ज्या सोनाराकडे विकले त्याची गोपनीय माहीती पोलीसांना मिळाली.
आरोपी विक्की उर्फ विडो याला ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली व मुख्य आरोपी परराज्यात असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्यातील आरोपी दादु उर्फ आकाश यंशवत घरडे रा.कन्हान याला पोलीसांनी दुर्ग ( मध्यप्रदेश)मधून पकडून आणले व सखोल विचारपूस केली असता त्यांनी यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात आणखी २ आरोपी असून ते फरार असल्याचे सांगितले . पोलीसांनी आरोपी १)
विक्की उर्फ विडो , २) दादु उर्फ आकाश यंशवत घरडे यांना ताब्यात घेऊन एकुण ४ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दोन आरोपींचा शोध कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल चव्हाण,पोलीस नापोशि महेश बिसेन हे करीत आहे .
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक पोलीस हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भाटकर यांचा आदेशाने कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व पोलीस निरीक्षक उमेश पाटील ,पोहवा हरीष सोनभद्र,पोना महेश बिसने,पोशि निखील मिश्रा,सम्राट वनपर्ती,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाट,उपनिरीक्षक बटुलाल पांडे,सफौ नाना राउत,पोहवा विनोद काळे,इकबाल शेख,पोना संजय बरोदीया,पोशि निलेश इगुलकर,पोहवा मुकेश शुक्ला सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .