युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
११ फेब्रुवारी रोजी ब्रह्मलीन श्रीसंत अच्युत महाराज ह्याचा शतकिय जयंती सोहळा मोचर्डा (म्हैसपूर)येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ७ वाजता श्रीसंत अच्युत महाराज ह्यांच्या मूर्तीचा पंचामृत अभिषेक गुरू मंदीर म्हैसपूर येथे करण्यात आला. त्या नंतर सकाळी ८ वाजता पासून श्री संत अच्युत महाराज पालखी गाव प्रदक्षिणा ताळ मृदुंग सह दिंड्यांच्या भक्तिमय हरिनामाचा गजर करण्यात आली.पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील दिंड्या व गुरू भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
पालखी प्रदक्षिणा झाल्यावर गुरू मंदिरात महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचा आयोजन गुरू मंदीर समिती तर्फे करण्यात आले होते. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी गुरू मंदिरात श्री संत अच्युत महाराज ह्यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरू श्री संत अच्युत महाराज मंदीर समिती तर्फे आलेल्या दिंड्या,दिंडी प्रमूख सहकार्य करणाऱ्या भाविक भक्ताचा शाल श्रीफळ हार व सन्माचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
शतकीय जयंती उत्सव सोहळ्या साठी समस्त मोचर्डा(म्हैसपूर), चांदई, खिरगव्हाण, नालवाडा, चिपर्डा व पंचक्रोशीतील सर्व नागरिक सहभागी झाले होते.