युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
संत गाडगे महाराजांनी सुरू केलेले समाज सेवा कार्य आजही त्यांच्या सेवकांनी जिवंत ठेवले आहे त्याचे उदाहरण म्हणजे १२० वर्ष असलेली परंपरा श्री गाडगे महाराज यात्रा महोत्सव श्रीक्षेत्र ऋणमोचन या परिसराला अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट दिली व घाट परिसर अस्वच्छ असल्याने त्यांनी तिथे नाराजी व्यक्त केली होती.
तीच बाब संस्थेचे पदाधिकारी व्यवस्थापक वसंतराव देशमुख यांनी लक्षात घेऊन शेवटचा चौथा पौष महिन्यातला रविवार हा अन्नदान वस्त्रदान गाडगेबाबाच्या कर्मभूमी आमला येथे केल्या जाते,तर दुसरीकडे भातकुली परिसरात श्री क्षेत्र ऋणमोचन येथे यात्रा भरली जाते.
या यात्रेमुळे नदीपात्राला अस्वच्छतेचे रूप तयार होते सर्वत्र घाणच घाण होत असल्याने श्री गाडगे महाराज लक्ष्मी नारायण चारिटेबल ट्रस्ट श्रीक्षेत्र ऋणमोचन आमला संस्थेचे पदाधिकारी व्यवस्थापक वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास समदुरे दापुरा, प्रमोद समदुरे, साहेबराव समजूरे ,भारत बांगर, अर्जुन बुवा भागवत एंडली आमला आदींनी श्रमदानाद्वारे पूर्णा नदी पात्र यात्रेमुळे अस्वच्छ झालेले श्रीक्षेत्र ऋणमोचन परिसर हा स्वच्छ केला. परिसरात जमा झालेला कचरा हा जाळून टाकण्यात आला व नदीपात्र केल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी यांनी जे काम शासनाला सांगितले होते ते काम दर्यापूर तालुक्यातील गाडगे बाबांच्या संस्थेच्या सेवकांनी पूर्ण केले आहे.हे कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे