रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातंर्गत प्रसिद्ध व विविध उपक्रमशिल अशी ओळख असलेल्या मौजा कोलारा (तु.)येथील ग्रामपंचायतच्या वतीने महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुका समन्वयक बारसागडे,सरपंच शोभा कोयचाडे,सदस्य गणेश येरमे,अविनाश गणविर,प्रियंका भरडे,ग्रामसेवक संजय ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
गणेश येरमे यांनी महीला सक्षमीकरण विषयक मार्गदर्शन केल तर बारसागडे यांनी बचत गटाविषयक मार्गदर्शन केले.यासह सरपंच शोभा कोयचाडे,ग्रामसेवक ठाकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
महिला मेळाव्यात,”एक कुटूब-एक कचरा कुडींचा व प्लास्टीक मुत्ती साठी सुद्धा थैल्याचा वाटप उपक्रम राबवित आला.
मौजा कोलारा (तु.) येथे महिला बचत गटातील व एक कुटूंबाला मान्यवराच्या हस्ते कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले.
गाव विकासाला महिला बचत गटाच्या योगदान महत्वाचा ठरला जात असतो,मौजा कोलारा (तु.)येथे तेहत्तीस महिला बचत गट आहे.त्याच्या कार्याची दखल घेत गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती चिमूर अंतर्गत ग्रायत्री महिला ग्रामसघ फलकाचे अनावरण शोभा कोयचाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला मेळावा कार्यक्रमाचे यशस्वीते करिता मडावी,रामटेके, माळवे आदी बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रामटेके यांनी केले तर उपस्थिस्थाचे आभार येरमे यानी मानले.
महिला मेळाव्याला बहुसख्यने महिला बचत गट सदस्या उपस्थित होत्या.परिसरात कचरा कुंडी वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.