मुनघाटे महाविद्यालयात पालक,माजी विद्यार्थी मेळावा व पदवीदान कार्यक्रम संपन्न.

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

       धानोरा येथील श्री.साई बाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालीत श्री.जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी,पालक व पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

         या कार्यक्रमाची सुरवात साई बाबा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व दिप लावून करण्यात आला.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गणेश चुदरी,प्रा.डॉ राजू कीरमीरे,प्रा.डॉ.डी.बी.झाडे,प्रा.डॉ.हरीष लांजेवार,पालक प्रतीनीधी म्हणून गीता वालको,माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सीमा काटेंगे व ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.लांजेवार यांनी केले.प्रास्ताविक भाषणातून महाविद्यालयाची प्रगती कशी होत गेली याविषयी सविस्तर माहीती सांगीतली.याप्रसंगी उपस्थित माण्यवरांनी महाविद्यालया संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

        याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी बि.ए. एम.ए व बि.एस.सी. च्या एकुण तीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

         अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ चव्हाण सरांनी महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान विभागाविषयी प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे आपल्या भाषणातून सांगण्यात आले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ वाघ यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.कैलास खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यात महाविद्यालयातील वरीष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.