जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ 24 तासांचे आत मृतकांच्या वारसांना मदत… — आमगाव येथील मृतक कुटुंबियांच्या नातेवाईकांना १६ लक्ष रुपयांचा धनादेश सुपुर्द… — विजेचा कडकडाट होत असतांना आवश्यक खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली, दि.26 : विजेच्या वज्रघाताने आमगावच्या मृत पावलेल्या भारत लक्ष्मण राजगडे यांच्या कुटुंबियांना आमदार कृष्णा गजबे, उपविभागिय अधिकारी जे. पी. लोंढे, तहसिलदार प्रियेश महाजन, नायब तहसिलदार राम नैताम यांच्या हस्ते १६ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. दोन दिवसांपुर्वी भारत राजगडे, पत्नी अंकिता, मुलगी देवांशी व मनस्वि लग्न समारंभ आटोपून परत येत असतांना देसाईगंज तुळशी फाटयाजवळ वादळ आल्याने झाडाचा आसरा घेतला. मात्र काळाने घाला घातला व राजगडे कुटुंबियांवर वीज कोसळल्याने कुटुंबातील चारही जण जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे, उप विभागीय अधिकारी लोंढे तहसीलदार महाजन यांनी मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन देत शासकीय तरतुदीची प्रक्रिया पुर्ण करुन प्रति मृतकांना ४ लाख रुपये प्रमाने ४ मृतकांचे १६ लक्ष रुपयाचा धनादेश मृतकाची आई पुष्पा लक्ष्मन राजगडे, बहिण अंजु गडपायले, प्रिती केळझरकर, स्मिता भोसकर यांना बहाल केला. या प्रसंगी माजी सरपंच योगेश नाकतोडे अनिल निकम यांचेसह गावकरी उपस्थित होते.

विजेचा कडकडाट होत असतांना आवश्यक खबरदारी घ्या – विजेचा कडकडाट होत असतांना काय करावे यामधे प्रामुख्याने शेताजवळील घराचा त्वरीत आसरा घ्यावा. पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर यावे. झाडाच्या उंची पेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. ओल्या शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरडया व सुरक्षित ठिकाणी जावे. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लॉस्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पाला – पाचोळा ठेवावे. धातूपासून बनलेल्या वस्तूंपासून दूर रहावे. विज वाहक वस्तूपासून दूर रहावे. उदा. रेडीयेटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप. विजेवर चालणाऱ्या यंत्रापासून दूर रहावे. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचाच वापर करावे. शक्य असल्यास आप-आपल्या घरी वीज अटकाव यंत्रणा बसवावी. टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन / टेलिव्हिजन टॉवर यापासून दूर रहावे. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जावे. अंगणामध्ये झाड असल्यास फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे,म्हणजे त्यावर विज पडणार नाही. वृक्ष, दलदलीची ठिकाणे किंवा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहावे. मोकळ्या जागी असाल तर खोलगट ठिकाणी रहावे. दोन व्यक्तीमधील अंतर किमान १५ फुट असावे. पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

विजेचा कडकडाट होत असतांना काय करू नये – धातुची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करु नये. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. उंच झाडाखाली उभे राहू नये. उंच जागेवर, झाडावर चढू नये. प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नये. दूरध्वनीचा वापर करु नये. वाहनातून प्रवास करणे टाळावे. धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. विद्युत उपकरणे चालू ठेवू नये. वीज कोसळून अपघात होऊ नये म्हणून….. घराबाहेर असाल तर… एकाकी असलेल्या शेडखाली उभे राहु नका. मोकळ्या मैदानातील अथवा परिसरात केवळ एकमेव उंच असलेल्या झाडाखाली उभे राहु नका. धातूची कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका. प्रवासात असल्यास पूर्णत: बंद असलेल्या वाहनात बसून राहा. एकाकी असलेल्या शेडखाली उभे राहु नका. मोकळ्या मैदानातील अथवा परिसरात केवळ एकमेव उंच असलेल्या झाडाखाली उभे राहु नका. धातूची कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका. प्रवासात असल्यास पूर्णत: बंद असलेल्या वाहनात बसून राहा. मैदानात असाल तर वाकून अथवा केवळ गुडघ्यावर बसा. शरीराचा कमीत कमी भाग जमिनीला स्पर्श करेल असे पाहा. जमिनीवर पूर्णपणे आडवे होऊ नका कारण ओली जमिन विजेची वाहक असते. पाण्यात असाल तर झटकन बाहेर या. तसेच समुद्र किनाऱ्यावर असाल तर तेथूनही तात्काळ दूर व्हा. बोटीत बसला असाल तर बोटीच्या मध्यभागी वाकून बसा. कोणत्याही उंच ठिकाणी थांबु नका, वीज आकर्षून घेणाऱ्या उंच ठिकाणापासून, इमारतीपासून दूर उभे राहा.

घरात असाल तर…- घराबाहेर पडू नका. लोखंडी पाईप, पाण्याचे नळ, स्टिलचे सिंक अशा वीजवाहक वस्तूंपासून दूर राहा. दारे व खिडक्यांपासूनही दूर राहा. दूरध्वनीचा वापर करु नका. कोणतेही विद्युत उपकरण (टिव्ही, मिक्सर, टोस्टर, ओव्हन आदी) वापरु नका. दूरध्वनी अथवा मोबाईल वापराबाबत : वीजा चमकत असतांना मोबाईलवर संभाषण करावे की करु नये याबबत जनतेत संभ्रम असतो. याबाबतीत मोबाईल कंपन्या आणि संशोधक यांच्यातही मतमतांतरे आढळतात पण वीजा चमकत असतांना कोणतीही धातूची वस्तू जवळ ठेवणे धोकादायक असल्याने साहजिकच मोबाईलही त्यामध्ये येतो. मानवी शरीर वीजेचे वाहक असल्याने या धातुकडे वीज आकर्षित झाल्यास विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे अशाप्रसंगी मोबाईलवरील अथवा दूरध्वनीवरील संभाषण टाळणे अधिक हितावह आणि सुरक्षित ठरेल.