राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा नगरपंचायतच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम सुरु आहे.
उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी दोन गेट आहेत.एका गेट समोरील नाली खोदकाम करुन नाली बांधकाम केले आहे.परंतु तो रस्ता पूर्ण न करता दुसऱ्या गेट समोरील खोदकाम सुरु केले आहे.
अती आवश्यक सेवा देणारे तालुका स्थळी उपजिल्हा रुग्णालय आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात.
ज्या प्रवेश द्वारातून रुग्णालयात रुग्णवाहिकेने रुग्ण आणले जातात तिथेच अरुंद रस्ता ठेवुन नालीचे खोदकाम सुरु केले आहे.कोणत्याही माणुसकीच्या भावना न ठेवता सर्रास पणे खोदकाम सुरु केले आहे.दुसऱ्या द्वाराचे काम अर्धवट आहे.
रुग्णांना रुग्णालयात आवागमन करण्यासाठी मार्गाची पर्यायी व्यवस्था न नाली बांधकामासाठी खोदकाम करणे उचित आहे काय?