राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
चिनेगाव गट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या गावात सकाळी ६ पासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा पुर्ण पणे खंडीत राहत असल्याने गावकर्यांचे विजेशी संलग्न कामे खोळंबली.
त्यामुळे गावकऱ्यांनी आपली व्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितली.त्वरित उपकार्यकारी अभियंता कार्यालयात ग्रामस्था सह धडक देत चिनेगाव व नजीकच्या गावातील विज पुरवठा सुरळीत करा असा इशारा दिला.
गावातिल ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कामे खोळंबली आहे.शेतीत रोवलेले धानाला विज नसल्याने पाणी देऊ शकत नाही. धान पिक करपण्याचा वाटेवर आहे.रात्री पाणी देऊ शकत नाही कारण लगतच जंगल आहे,जंगली श्वापदांची,वाघांची भीती ने रात्रो शेतात जाऊ शकत नाही.
एकाच वाशी फीडर वर बारा तास लोड मॅनेज करण्यात येत असुन,बारा तास ऐवजी दोन ते तीन तासच लोड मॅनेज कारवाईत विज खंडीत ठेवावी अशा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला.
यावेळेस ग्राप सदस्य नेताजी कोटनाके,शिवाजी कुमरे, विजय मसराम,दिलीप आडेसह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.