ब्रेकिंग न्यूज़… — उपविभागीय अधिकारी (महसूल)कार्यालय कुरखेडा येथील अव्वल कारकुन यास लाच घेतांनी अटक… — लाच लुचपत विभाग गडचिरोली ची कारवाई… 

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि

             कुरखेडा येथील उप विभागीय अधिकारि (महसूल) कार्यालय येथील कार्यरत अव्वल कारकून नागसेन वैद्य यास कार्यालयात १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. 

          सविस्तर वृत्त कुरखेडा तालुक्यातील तक्रारदार याने आदिवासी ते आदिवासी जमीन खरेदी प्रकरणात परवानगी मिळवून देण्यासाठी १५हजार रुपयांची लाच मागणी केली होती, परंतु त्याला लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत विभागात तक्रार नोंदवली होती.

           प्रकरणाची शहिनिशा करुन पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर,अपर पोलिस अधीक्षक सचीन कदम,अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलिस उप अधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या चमुने ही कारवाई केली.

             या कारवाईने लाच घेणार्यांचे धाबे दणाणले आहे. उप विभागीय अधिकारी (महसूल)कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर विविध चर्चेला उधान आले आहे.