बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक पूर्ववत सुरू करा, राजू झोडे यांचे तहसीलदारांना निवेदन… — अन्यथा रेल रोको आंदोलन करू…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 

              बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग असलेला रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक मागील 15 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळं येथील वाहतूक पूर्ववत सुरू करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. दरम्यान सोमवारी झोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकानी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

          बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे. परिणामी मागील 15 दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करम्यात आली असून शाळकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कार साठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

           त्यामुळं तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी चेतन गेडाम, संपत कोरडे, ईस्माइल कच्ची, श्यामभाऊ झिलपे, बालकृष्ण कडेल, गुरू कामटे, नितिन साठे, शंकर महाकाली, रेणूका कडेल, आदि लोक उपस्थित होते.