निलय झोडे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
साकोली : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जि. भंडारा अंतर्गत साकोली येथील पत्रकार संघ भवनाकरीता निधी उपलब्ध करण्याबाबद माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परीणय फुके यांना सोमवार ( २९.जाने.) ला लाखनी कार्यालयात पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. तद्वतच आ. डॉ. परीणय फुके यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून साकोली पत्रकार संघ भवनासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासनही दिले.
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संच-म.रा. अंतर्गत साकोली शहरातील मध्यवर्ती नविन तलाव बायपास रोडवर जिल्हा संघ पत्रकार संघ” जागा व फलकाचा लोकापर्ण सोहळा मागे पत्रकार दिनी ०६ जाने.ला संपन्न झाला. कारण भविष्यात साकोली जिल्हा झाल्यास सदर पत्रकार भवन हे जिल्हयाचे मध्यवर्ती प्रेस मिडिया कार्यालय होणार, या जागेवर जनहितार्थ बातमी संकलन, न्यूज अपडेट आणि सर्वांसाठी मुलाखत घेण्याचे प्रेस स्टूडियो भवन निर्माण करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद साकोली कडून हि नियोजित जागा मुकरर झाली. सदर सर्व प्रिंट मिडीया, डिजीटल मिडीया, वृत्तपत्रे प्रतिनिधी व वेबन्यूज मिडीयाचे पत्रकार व कॅमेरामन या शासन मान्यताप्राप्त संघात पदाधिकारी व सभासद आहेत.
तरी सर्व जनहित सोयीनुसार या ” साकोली पत्रकार भवन निर्माण कार्याला योग्य निधी उपलब्ध करून देण्यासाठी लाखनी येथील आयोजित जनता दरबार मध्ये निवेदन सादर करण्यात आले. प्रसंगी आमदार डॉ. परीणय फुके यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच साकोली पत्रकार सेवा संघाला भवनाकरीता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, युवती जिल्हाध्यक्षा रोहिणी रणदीवे, साकोली तालुका अध्यक्ष निलय झोडे, शहराध्यक्ष ऋग्वेद येवले, शहर सचिव किशोर बावणे हे या चर्चेला उपस्थित होते.