रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र (रत्नागिरी) चंद्रपूर व जिल्हा गडचिरोली तथा साहित्यलेणी विचारमंच (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) अमरावती यांना प्रदान करण्यात आला. हे संमेलन सुप्रसिद्ध कवी, लेखक, संपादक डॉ सुनिल पवार (बुलढाणा) यांच्या कवी संमेलनाध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले. यामध्ये उद्घाटक म्हणून शिवानिताई वडेट्टीवार,स्वागताध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री, कार्यक्रमाध्यक्ष भावना खोब्रागडे, संस्थापक अध्यक्ष कवी मनोज जाधव सर, प्रमुख अतिथी मा.नरेन्द्र अनंत पवार, मा.राहुल परुळकर, प्रा. डॉ.देवेश कांबळे, मा.गजानन माद्यस्वार, डॉ प्रेमकुमार खोब्रागडे,या.जगदिश राऊत,मा.नितिनभाऊ मत्ते इत्यादी उपस्थित होते. कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.