प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव मध्ये शिंगणापूर (मुले)या शाळेने पटकाविला निदर्शनात प्रथम क्रमांक….

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

      नुकत्याच झालेल्या तालुका प्राथमिक क्रीडा महोत्सवचा समारोप तालुका क्रीडा संकुल दर्यापूर येथे विनोद खेडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, दर्यापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

            या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पोलिस स्टेशन दर्यापूरचे पोलीस निरीक्षक संतोष टाले, नायब तहसीलदार अनिल नाडेकर, पंचायत समितीचे दर्यापूरचे गटशिक्षणाधिकारी डी.सी. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश निभेंकर, सर्व शिक्षक संघटनेचे जिल्हा स्तरीय पदाधिकारी तसेच तालुक्याचे सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व केंद्रप्रमुख मैदान प्रमुख तसेच सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक तसेच खेळ प्रभारी शिक्षक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

             सांघिक खेळा मध्ये प्राथमिक चम्पियन वडनेर गंगाईने पटकाविले तर माध्यमिक चॅम्पियन दारापूर उर्दू यांनी पटकाविले तर जनरल चॅम्पियन दारापूर उर्दू शाळेने पटकाविले.

      तसेच तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव मध्ये निदर्शनामध्ये जिल्हा परिषद शाळा शिगणापूर मुले पंचायत समिती दर्यापूर यांचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्या शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शाळेच्या उच्च श्रेणी.मुख्याध्यपिका शिला आठवले तसेच ज्यांनी चिमुकल्या मुलीचे हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे निदर्शन बसविले त्या शाळेच्या सहायक शिक्षिका संगीता टोपे , ललिता फुटाणे ,लता कडू , विषय शिक्षक अब्दुल शहजाद तसेच वसुंधरा चव्हाण या विद्यार्थिनी ७५ मिटर धावने व ७५ मिटर दोरी वरील उड्या मध्ये पहिला क्रमांक आला. 

   तसेच जिल्हा परिषद शाळा पेठ इतबारपूर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला.

          निदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणुन गजानन सरदार, मिनाक्षी मोरे प्रबोधन विद्यालय दर्यापूर यांनी काम पाहले. सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा डी. आर. जामनिक आणि लता गजभिये यांनी सांभाळली.