कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी::-आज दि.१९ जानेवारी २४ ला ग्रामपंचायत पालोरा येथे आदर्श प्रभागसंघ करभाड (पारशिवनी) मासिक सभा घेण्यात आली. आणि हळदी कुंकू आणि जेन्डर विषयी कार्यक्रम घेण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पुष्पा गोरले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक आणि श्रीमती प्रगती नारनवरे पोलीस ठाणे पारशिवनी हे उपस्थित होते.
याप्रसंगी राहुल सोनवणे( पो नि) यांनी महिलावरील होणारे अत्याचार आणि फसवणूक व महिलांना कायदे विषयी मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती प्रगती ( पोलिस स्टेशन पारशिवनी) यांनी महिलांचे हक्क व अधिकार घरघुती हिंसाचार विषयी महिलांना जागृती पर मार्गदर्शन केले. तसेच अनुलोम संस्थेचे धर्मेंद्र दुपारे यांनी अनुलोम संस्थेचे महिलाचे कार्यविषयी माहिती दिली.
कार्यक्रमात आदर्श प्रभागसंघाच्या पदाधिकारी यांनी महीला सदस्यना वान देऊन उखाणे घेतले.
महीला बचत गटा चे सि.आर.पी. गरंडा गांव यांनी सपना कोहळे यांनी महालक्ष्मी सरस मुंबई तील सहभागाचे अनुभव सांगून महिलांना प्रदर्शनीसाठी उत्साहित केले.
पंचायत समिती पारशिवनीचे अधिकारी तालुका व्यवस्थापक राजू बोरकर यांनी उमेद अभियान आणि महिलांनी व्यवसाय कडे वळावे या विषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रभागसंघांचे अध्यक्ष श्रीमती हर्षा धान्डे, श्रीमती प्रणिता वाघमारे सचिव श्रीमती माधुरी वासाडे, कोषध्यक्ष वर्षा खंडाते, सुषमा चकोले, चेतना कोतेकर, कल्पना बागडे, जयश्री गोमकाळे, वंदना कामडे, सुषमा शेंडे, रुपाली जगनाडे, पूनम बावणे,नयना चव्हान,सुनीता हिंगणकर, जयश्री शेंडे, योगिता सहारे आणि तालुकातील सर्व ग्रामसंघांचे अध्यक्ष सचिव कोषध्यक्ष पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
आभार प्रदर्शन कल्याणी लांजेवार यांनी केले.